मेदिनापूरमध्ये ‘एनआयए’ पथकाविरुद्ध ‘एफआयआर’

पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनापूर जिल्ह्यात २०२२ मध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी शनिवारी एनआयएने बालाई चरण मैती आणि मनोव्रत जाना या दोघा मुख्य सूत्रधारांना अटक केली. या स्फोटात तीन जण ठार झाले होते.
मेदिनापूरमध्ये ‘एनआयए’ पथकाविरुद्ध ‘एफआयआर’
(संग्रहित छायाचित्र)
Published on

कोलकाता : तपास करण्याच्या बहाण्याने भूपतीनगरमधील घरात जबरदस्तीने घुसून आपला विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशा आशयाचा एफआयआर तृणमूल काँग्रेसचे अटक करण्यात आलेले नेते मनोव्रत जाना यांच्या पत्नीने एनआयए अधिकाऱ्यांविरुद्ध नोंदविला आहे, असे रविवारी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनापूर जिल्ह्यात २०२२ मध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी शनिवारी एनआयएने बालाई चरण मैती आणि मनोव्रत जाना या दोघा मुख्य सूत्रधारांना अटक केली. या स्फोटात तीन जण ठार झाले होते. शनिवारी सकाळी एनआयएचे अधिकारी आपल्या घरात घुसले आणि घरातील मालमत्तेची तोडफोड केली, असे जाना यांच्या पत्नी मोनी जाना यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, एनआयएचे पथक दोन सूत्रधारांच्या अटकेसाठी गेले असता त्यांच्यावर जमावाने हल्ला केला. यावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

logo
marathi.freepressjournal.in