तामिळनाडूत एनआयएची २१ ठिकाणी छापेमारी

बंदी घातलेल्या पीएफआय संघटनेच्या पाच फरार घोषित आरोपींच्या घरांवर छापेमारी करण्यात आली
तामिळनाडूत एनआयएची २१ ठिकाणी छापेमारी

चेन्नई : रामलिंगम हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवारी तामिळनाडूच्या ९ जिल्ह्यांत २१ ठिकाणी छापेमारी केली.

बंदी घातलेल्या पीएफआय संघटनेच्या पाच फरार घोषित आरोपींच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. यात काही कागदपत्रे व डिजिटल उपकरणे ताब्यात घेतली.

५ फेब्रुवारी २०१९ मध्ये रामलिंगम यांची हत्या झाली होती. ६ फेब्रुवारी २०१९ मध्ये याचा तपास सुरू झाला. ७ मार्च २०१९ ला हे प्रकरण एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतले. रामलिंगम याची हत्या धार्मिक संघटनांमध्ये शत्रुत्व वाढल्याने व बदल्याच्या भावनेने करण्यात आली. कारण ते जबरदस्तीने धर्मांतराचा विरोध करत होते. त्यामुळे रामलिंगम याची हत्या केली. या प्रकरणी २ ऑगस्ट २०२१ मध्य एनआयएने पीएफआयचे सदस्य रहमान शादिक याला अटक केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in