‘एनआयए’चे सात राज्यांत छापे ; बंगळुरू तुरुंगातील कट्टरतावादप्रकरणी तपास

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी बंगळुरूतील कैद्यांच्या कट्टरपंथीकरणाशी संबंधित प्रकरणाच्या संदर्भात सात राज्यांमध्ये अनेक छापे टाकले.
‘एनआयए’चे सात राज्यांत छापे ; बंगळुरू तुरुंगातील कट्टरतावादप्रकरणी तपास
(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी बंगळुरूतील कैद्यांच्या कट्टरपंथीकरणाशी संबंधित प्रकरणाच्या संदर्भात सात राज्यांमध्ये अनेक छापे टाकले. एनआयएने ७ राज्यांमधील १७ ठिकाणी छापे टाकले आहेत.

जानेवारीमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या प्रकरणी आठ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. बंगळुरू शहर पोलिसांनी गेल्या वर्षी १८ जुलै रोजी आरोपींपैकी सात जणांकडून शस्त्रे, दारूगोळा, हातबॉम्ब आणि वॉकी-टॉकी जप्त केल्यानंतर गुन्हा दाखल केला होता. आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये केरळच्या कन्नूर येथील टी. नसीर हा २०१३ पासून बंगळुरूच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याने बंगळुरूच्या कारागृहातील कैद्यांना लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या जाळ्यात ओढण्यासाठी कट्टर इस्लामी विचारांचा प्रभाव पाडला, असा आरोप आहे. अन्य आरोपी जुनेद अहमद उर्फ जेडी आणि सलमान खान हे दोघे परदेशात पळून गेल्याचा संशय आहे. हे सर्वजण लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते आणि देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचत होते. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर एनआयएने मंगळवारी छापे टाकले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in