'बब्बर खालसा इंटरनॅशनल' बाबत NIA चा मोठा खुलासा ; परदेशातील खलिस्तान्यांना मदत करत असल्याचा दावा

BKI कॅनडा, अमेरिका, युके, बेल्जियम, जर्मनी, फ्रॉन्स, नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि पाकिस्तानमध्ये सक्रिय असल्याचं NIA ने म्हटलं आहे.
'बब्बर खालसा इंटरनॅशनल' बाबत NIA चा मोठा खुलासा ; परदेशातील खलिस्तान्यांना मदत करत असल्याचा दावा

प्रतिबंधित असलेली दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल संपूर्ण जगात दहशतवादाचे जाळे पसरवत आहे. ही संघटना विविध देशांमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या खलिस्तान समर्थकांच्या मदतीने आपल्या महत्वपूर्ण सदस्य आणि तडीपार आतंकवाद्यांना मदत करत आहेत, असं NIAने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

बीकेआयने महत्वाच्या सुरक्षा दलांना लक्ष्य केलं आहे. मोहालीतील पंजाब पोलीस इंटेलिजन्स मुख्यालयावर RPG दहशतवादी हल्ला, तरनतारनमधील सरहाली पोलीस स्टेशनवर हल्ला याचा यात समावेश असल्याचं अहवालात म्हटलं आहे.

बब्बर खालसा इंटरनॅशनल कॅनडा, अमेरिका, युके, बेल्जियम, जर्मनी, फ्रॉन्स, नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि पाकिस्तानमध्ये सक्रिय आहे. दहशतवादी गट पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या (ISI) च्या पाठिंब्याने पाकिस्तानमधून कार्य करत आहे.

भारत, युरोपियन, युनियन, जपान, मलेशिया, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स यासह अनेक देशांनी या संघटनेवर अधिकृतपणे बंदी घातली असल्याचं NIA ने आपल्या अहवालात म्हटलं आहे. याच बरोबर NIA ने अनेक आरोप केले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in