२०२४ अखेरीस निफ्टी २३,५००वर झेपावणार

नोव्हेंबर आणि डिसेंबरमधील निफ्टी 50 मधील तेजी पाहता मॅक्रो वातावरणातील सुधारणांचा भारतीय शेअर बाजाराला नक्कीच लाभ होईल.
२०२४ अखेरीस निफ्टी २३,५००वर झेपावणार

मुंबई - गोल्डमन सॅक्सने नोव्हेंबरच्या अहवालात नमूद केलेल्या २१,८०० अंक यापूर्वीच्या अंदाजात वाढ करुन आता २०२४ च्या अखेरीस बेंचमार्क निफ्टी 50 चे लक्ष्य २३,५०० पॉइंट्सपर्यंत झेपावेल, असा नवा अंदाज व्यक्त केला आहे. एमएससीआय इंडिया युनिव्हर्समध्ये वर्षभरात कंपन्यांच्या नफ्यात १५ टक्के वाढ होण्याच्या शक्यतेने निर्देशांकातही वाढ अपेक्षित आहे, असे ब्रोकरेज फर्मने २०२४ साठीच्या आपल्या ताज्या अंदाज अहवालात माहिती दिली आहे.

ब्रोकरेजने सांगितले की, गेल्या दोन महिन्यांत जागतिक मॅक्रो वातावरण अधिक अनुकूल झाले आहे आणि आता यूएस फेडरल रिझर्व्ह मार्चपासून व्याजदरात कपात करण्यास सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे. पुढे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जुलै-सप्टेंबरमध्ये व्याजदर कमी करण्यास सुरुवात करेल, अशी अपेक्षा आहे. ब्रोकरेजने याआधी आरबीआयकडून ऑक्‍टो.-डिसेंबर २०२४ मध्ये व्याजदर कपातीची अपेक्षा व्यक्त केली होती. पूर्वीच्या-अपेक्षेपेक्षा व्याजदर कमी करणे आणि जागतिक जोखीम वाढवणे यामुळे निफ्टी 50 अधिक वाढेल, असे ब्रोकरेजने म्हटले आहे.

ब्रोकरेज फर्मने सांगितले की, भारतीय समभागांना सध्याच्या मॅक्रो वातावरणात फायदा झाला पाहिजे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमधील निफ्टी 50 मधील तेजी पाहता मॅक्रो वातावरणातील सुधारणांचा भारतीय शेअर बाजाराला नक्कीच लाभ होईल.

गोल्डमन सॅक्सने २०२४ मध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ६.२ टक्के राहील, असे म्हटले आहे. आरबीआयने डिसेंबर २०२३-२४ (एप्रिल-मार्च) साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ५० बेस पॉइंट्सने वाढवून ६.५ टक्क्यांवरून ७ टक्के केला आहे. जुलै-सप्टेंबरमध्ये ७.६ टक्क्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढीचा अंदाज आहे. २०२२-२३ मध्ये भारताचा जीडीपी ७.२ टक्के इतका वाढला.

logo
marathi.freepressjournal.in