निज्जर, पन्नूनची मालमत्ता जप्त राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई

शनिवारी सकाळी एआयएने निज्जरची मालमत्तादेखील जप्त केली
निज्जर, पन्नूनची मालमत्ता जप्त राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई
Published on

नवी दिल्ली : कॅनडात मारला गेलेला खलिस्तानी म्होरक्या हरदीपसिंग निज्जर आणि सिख्स फॉर जस्टिस या बंदी असलेल्या संघटनेचा म्होरक्या गुरपटवंत सिंग पन्नून या दोघांची भारतातील मालमत्ता राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी जप्त केली. या दोघांनाही भारताने यापूर्वीच दहशतवादी घोषित केले होते.

गुरपटवंत सिंग पन्नून सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात राहत असून त्याने भारतीयांना कॅनडातून निघून जाण्याची धमकी दिली आहे. तो अमेरिका आणि कॅनडात खलिस्तानवादी कारवाया करत होता. चंदीगड येथील त्याची स्थावर मालमत्ता आणि अमृतसर येथील शेतजमिनीजवळ एनआयएने जप्तीची नोटीस लावली होती. त्यानंतर शनिवारी या दोन्ही मालमत्ता जप्त करण्यात आल्या. तत्पूर्वी शनिवारी सकाळी एआयएने निज्जरची मालमत्तादेखील जप्त केली.

गेल्या काही दिवसांत एनआयएने खलिस्तानी समर्थकांविरुद्ध कारवाई अधिक व्यापक केली आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनल या संघटनेच्या अनेक नेत्यांवर प्रत्येकी १० लाख रुपयांचे इनाम लावण्यात आले. एनआयएने नुकतीच ४३ मोस्ट वाँटेड गुन्हेगारांची यादी जाहीर केली. त्यात कॅनडा आणि खलिस्तानी चळवळीशी संबंधित अनेक दहशतवाद्यांचा समावेश आहे. एनआयएने लॉरेन्स बिश्नोई, जसदीप सिंग, काला जथेरी उर्फ संदीप, वीरेंद्र प्रताप उर्फ काला राणा आणि जोगिंदर सिंग यांची छायाचित्रे जारी करून त्यांच्या मालमत्तेची माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in