निपाह व्हायरसची संख्या वाढली ; केरळसह अनेक राज्यांनी जाहीर केला अलर्ट...

कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने केरळपासून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवरील तपासणीत वाढ करण्यात केली आहे.
निपाह व्हायरसची संख्या वाढली ; केरळसह अनेक राज्यांनी जाहीर केला अलर्ट...
Published on

भारत कोरोना मधून सावरत असतानाच आता निपाह व्हायरसने एन्ट्री केली आहे .या व्हायरसचे रुग्ण केरळमध्ये जास्त प्रमाणात आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. निपाह व्हायरसच्या रुग्णांची संख्या केरळमध्ये दिवसेंदिवस अधिक वाढत चालली आहे. केरळमधील वातावरण बघता केरळ सरकारनेही यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. तामिळनाडूसह कर्नाटकने देखील खबरदारीचा उपाय म्हणून नुकताच अलर्ट जारी केला आहे.

तामिळनाडू सरकारने एक परिपत्रक जारी केलं आहे. केरळच्या ज्या भागात निपाह व्हायरसची रुग्णसंख्या जास्त प्रमाणात आहे. त्या भागात विनाकारण प्रवास टाळा, असा सल्लाही देण्यात आला आहे. कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने केरळपासून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवरील तपासणीत वाढ करण्यात केली आहे. केरळमधील आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयाने माहिती देताना सांगितले की, कोळीकोड येथील रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या ३९ वर्षीय व्यक्तीमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे.

निपाह हा विषाणू वटवाघळांच्या माध्यमातून मानवांमध्ये पसरतो. त्याचबरोबर डुक्कर, कुत्रे, मांजर, घोडे आणि मेंढ्यांमधून देखील हा विषाणू पसरू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला निपाह व्हायरस झाला असेल तर त्याच्यामुळे तो इतरांनाही संक्रमित करू शकतो. निपाह व्हायरस हा कमी संसर्गजन्य आहे परंतु जास्त प्राणघातक मानला जातो. या गोष्टीचा अर्थ असा की, कमी लोकांना या वायरसची लागण होऊ शकते, परंतु मृत्यूचे प्रमाण यात जास्त आहे. केरळमध्ये जेव्हा निपाह विषाणूचा प्रसार झाला तेव्हा त्याचा मृत्यूदर ४५ ते ७० टक्के इतका होता.

इतकेच नाही तर निपाह व्हायरसमुळे जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही याची लागण होऊ शकते. अशा परिस्थितीत व्यक्तीचे अंतिम संस्कार करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जर कोणत्या व्यक्तीला निपाह विषाणूची लागण झाली तर त्याला जास्त ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यात अडचण, घसा खवखवणे, अॅटिपिकल न्यूमोनिया यांसारखी लक्षणे दिसून येतात. जर परिस्थिती अधिक गंभीर असल्यास, व्यक्ती 24 ते 48 तासांच्या आतमध्ये एन्सेफलायटीसची शिकार होऊ शकते आणि तो व्यक्ती कोमात जाऊ शकतो.

logo
marathi.freepressjournal.in