.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : हजारो कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याची सुमारे २९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली. नीरव मोदी सध्या लंडनमध्ये असून त्याच्यावर तेथील कोर्टात खटला सुरू आहे.
मोदी याने पंजाब नॅशनल बँकेमध्ये ६ हजार ४९८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार करून तो लंडन येथे पळून गेला होता. या प्रकरणी तपास सुरू असून ईडीने मोदी याच्या भारतातील आणखी काही मालमत्ता शोधून काढल्या आहेत़ या मालमत्तांमध्ये जमीनी, इमारती आणि बँकांमधील पैशांचा समावेश आहे. मोदी आणि त्याच्या कंपनीशी निगडित आणखी काही मालमत्ता याआधी ईडीने जप्त केलेल्या आहेत.