भारतीय तपास यंत्रणा छळ करतील; नीरव मोदी याची याचिका

मला भारतात पाठवण्यात आल्यास भारतीय तपास यंत्रणा चौकशीच्या काळात माझा छळ करतील, असा दावा पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करून परदेशात फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याने केला आहे. त्यामुळे त्याने लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टात प्रत्यार्पण खटल्यावर पुन्हा सुनावणीची मागणी केली.
भारतीय तपास यंत्रणा छळ करतील; नीरव मोदी याची याचिका
पीटीआय
Published on

लंडन : मला भारतात पाठवण्यात आल्यास भारतीय तपास यंत्रणा चौकशीच्या काळात माझा छळ करतील, असा दावा पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करून परदेशात फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याने केला आहे. त्यामुळे त्याने लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टात प्रत्यार्पण खटल्यावर पुन्हा सुनावणीची मागणी केली. या प्रकरणी २३ नोव्हेंबरला सुनावणी होऊ शकते.

या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणी एक आरोपपत्र दाखल केले. आता त्याची चौकशी गरजेची आहे. आमचा तपास जवळजवळ पूर्ण झालेला आहे, तर इंग्लंडमधील न्यायालयाने आमच्याकडे विचारणा केल्यास, मोदीला भारतात आणल्यावर त्याची चौकशी केली जाणार नाही, असा विश्वास आम्ही त्याला देऊ.

नीरव मोदीने पीएनबी बँकेची फसवणूक करून ६४९८ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम हडप केल्याचा आरोप आहे. नीरवने शेकडो लेटर ऑफ अंडरटेकिंगचा दुरुपयोग केला. नीरवला मार्च २०१९ मध्ये अटक झाली होती. तो आता इंग्लंडच्या तुरुंगात आहे. त्याला भारतात आणण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in