सीतारामन, जयशंकर लोकसभा लढवणार: प्रल्हाद जोशी

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि एस. जयशंकर आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे नक्की झाले आहे. मात्र...
सीतारामन, जयशंकर लोकसभा लढवणार:  प्रल्हाद जोशी
Published on

हुबळी : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि एस. जयशंकर आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे नक्की झाले आहे. मात्र ते नेमके कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील हे नक्की झालेले नाही, असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. हे दोघे कर्नाटकमधून निवडणूक लढवतील की अन्य कुठून, ते अद्याप निश्चित झालेले नाही. ते बंगळुरूमधून निवडणूक लढवतील का, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी ही माहिती दिली. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन या कर्नाटकमधून व परराष्ट्र मंत्री जयशंकर हे गुजरातमधून राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in