‘जिरोधा’चे सीईओ नितीन कामत यांना ह्रदयविकाराचा झटका

मला जीवनशैलीत बदल करावे लागतील. मी या घटनेने थोडा घाबरलो आहे. पण, लवकरच मी धावण्यासाठी तयार होईन
‘जिरोधा’चे सीईओ नितीन कामत यांना ह्रदयविकाराचा झटका
Published on

बेंगळुरू : ‘जिरोधा’चे सीईओ नितीन कामत यांना सहा आठवड्यांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला होता. या आजारातून बाहेर पडायला किमान तीन ते सहा महिने लागतील, असे कामत यांनी सांगितले.

कामत यांनी सांगितले की, वडिलांचा मृत्यू, कमी झोप, थकवा, पाण्याची कमतरता, जास्त व्यायाम व जास्त काम केल्याने हा ह्रदयविकाराचा झटका आला असावा. माझा चेहरा झुकला होता. वाचताना व लिहिताना त्रास होत होता. मी माझ्या आरोग्याची काळजी घेत असूनही मला ह्रदयविकाराचा झटका आला याबाबत मला आश्चर्य वाटते. आता मला जीवनशैलीत बदल करावे लागतील. मी या घटनेने थोडा घाबरलो आहे. पण, लवकरच मी धावण्यासाठी तयार होईन, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in