मेहसाणा : गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी रविवारी मेहसाणा मतदारसंघाच्या शर्यतीतून माघार घेतली. समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या पत्रात पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसरा कार्यकाल मिळण्याची आशाही व्यक्त केली आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्याच्या एक दिवसानंतर पटेल यांनी ही घोषणा केली आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत मेहसाणा मतदारसंघाचा समावेश नव्हता. या यादीत आसाम, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधील ३४ केंद्रीय मंत्री आणि दोन माजी मुख्यमंत्र्यांसह एकूण १९५ नावे आहेत. गुजरातमध्ये पाच विद्यमान खासदारांना डावलण्यात आले.