नितीश कुमारांचे चार आमदार फुटले?पक्षाच्या बैठकीला गैरहजर

चौधरी यांच्या घरी जदयूचे जवळपास सर्व आमदार आले खरे पण डॉ.संजीव सिंग, रिंकू सिंग, विमा भारती, दिलीप सिंग आणि सुदर्शन कुमार यांचा काही समावेश त्यात नव्हता.
नितीश कुमारांचे चार आमदार फुटले?पक्षाच्या बैठकीला गैरहजर
Published on

पाटणा : बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे निकटवर्तीय मंत्री विजय चौधरी यांच्या निवासस्थानी मेजवानीचे आयोजन करण्यात आले होत. मात्र, या बैठकीला संयुक्त जनता दलाचे (जदयू) चार आमदार न पोहोचल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

चौधरी यांच्या घरी जदयूचे जवळपास सर्व आमदार आले खरे पण डॉ.संजीव सिंग, रिंकू सिंग, विमा भारती, दिलीप सिंग आणि सुदर्शन कुमार यांचा काही समावेश त्यात नव्हता. त्यामध्ये आमदार विमा भारती यांच्ये वैयक्तिक सचिव अरविंद कुमार यांनी सांगितले की, तातडीच्या वैद्यकीय कामामुळे त्यांना पाटणामधून बाहेर जावे लागले त्या लवकरच पाटण्याला पोहोचतील. मात्र, सुदर्शन आणि दिलीप राय यांचे मोबाईल बंद होते. या संबंधात मंत्री विजय चौधरी म्हणाले की, जदयूचे आमदार आमच्या संपर्कात आहेत.’ चौधरी यांच्या निवासस्थानी सुरू असलेली जदयू आमदारांची बैठक संपली असून बैठकीला पाच आमदार उपस्थित नव्हते. त्यापैकी विमा भारती, सुदर्शन, दिलीप राय आणि रिंकू सिंग या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. यापैकी जेडीयू आमदार विमा भारती, सुदर्शन आणि दिलीप राय यांचे मोबाईलही बंद आहेत. या चार आमदारांशिवाय डॉ. संजीवही बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. तो पाटण्याबाहेर असल्याचे बोलले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in