कुतुबमिनारमध्ये कोणतेही उत्खनन केले जाणार नाही

कुतुबमिनारमध्ये  कोणतेही उत्खनन केले जाणार नाही
Published on

कुतुबमिनार संकुलात पुरातत्त्व सर्वेक्षणाकडून कोणतेही उत्खनन केले जाणार नाही. आतापर्यंत आम्ही याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही,” असे स्पष्टीकरण केंद्रीय सांस्कृतिकमंत्री जी. किशन रेड्डी यांनी रविवारी दिले.

कुतुबमिनारजवळ असलेल्या मशिदीपासून १५ मीटर अंतरावर उत्खनन केले जाऊ शकते. मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी यासाठी शनिवारी उच्चस्तरीय बैठकही घेतली आहे, याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. कुतुबमिनारमध्ये शेवटचे उत्खनन १९९१मध्ये झाले होते. १७ मे रोजी, दिल्लीच्या साकेत न्यायालयात, कुतुबमिनार परिसरात पूजेची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या याचिकेवर २४ मे रोजी सुनावणी होणार आहे. संयुक्त हिंदू आघाडीने २०२२मध्ये याचिका दाखल केली होती. याचिकेत म्हटले होते की, कुतुबमिनार येथे असलेली कुव्वत-उल-इस्लाम मशीद हिंदू आणि जैन धर्माची २७ मंदिरे पाडून बांधली होती. अशा स्थितीत तेथे पुन्हा मूर्ती स्थापन करून पूजेला परवानगी द्यावी.

logo
marathi.freepressjournal.in