संरक्षणमंत्र्यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापासून कोणतीही अपेक्षा नाही - फारुख अब्दुल्ला

कुलगाममध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. पूंछमधील नागरिकांच्या मृत्यूसारख्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
संरक्षणमंत्र्यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापासून कोणतीही अपेक्षा नाही - फारुख अब्दुल्ला
PM

श्रीनगर  : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या जम्मू आणि काश्मीर दौऱ्यामधून आपल्या काहीही अपेक्षा नाहीत, असे सांगत त्यामुळे काही मृतांना परत आणू शकता का, तितकी ताकद त्यांच्याकडे आहे का, असा सवाल करीत अशा अन्यायाची पुनरावृत्ती होऊ नये, याची दक्षता त्यांनी आता घेतली पाहिजे, असे उद््गार नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना काढले.

कुलगाममध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. पूंछमधील नागरिकांच्या मृत्यूसारख्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 गेल्या गुरुवारी पुंछमध्ये लष्कराच्या दोन वाहनांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार सैनिक ठार झाले होते. त्या संबंधात  लष्कराने चौकशीसाठी ताब्यात घेतलेले तीन नागरिक मृत आढळून आले. या पार्श्वभूमीवर आता बोलताना अब्दुल्ला म्हणाले की, आमचे लोक मारले गेले म्हणून सिंह यांनी येथे भेट दिली आहे आणि आता चे पीडितांच्या कुटुंबीयांच्या जखमावर मलम लावतील.

काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेसंबंधात बोलताना अब्दुल्ला म्हणाले की,  राहुल गांधी "देशाला एकत्र करण्याचा प्रयत्न करीत आहेत. समुदायांमधील अविश्वास आणि द्वेष दूर करण्याचा तो प्रयत्न करत आहे. आम्ही यापूर्वीही या प्रयत्नाचा एक भाग होतो आणि आम्ही पुन्हा त्याचा भाग होऊ.

मंगळवारी अब्दुल्ला म्हणाले की त्यांनी पाकिस्तानशी चर्चेला अनुकूलता दर्शविली, अन्यथा "गाझामध्ये पॅलेस्टिनींसोबत घडत असलेल्या परिस्थितीला आम्हालाही सामोरे जावे लागेल. दोन देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध सुनिश्चित करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चेची वकिली करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in