नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो बदलण्याचा विचार नाही

नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो बदलण्याचा विचार नाही
Published on

भारतीय चलनावर नेहमीच महात्मा गांधींचे चित्र पाहिले जाते. परंतु काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय रिझर्व्ह बँक आता भारतीय चलनात मोठा बदल करण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात आले आहे. नोटांवर छापण्यात आलेल्या महात्मा गांधींच्या चित्रामुळे हा बदल होणार आहे. हे वृत्त प्रसारमाध्यमांचे मथळे बनल्यानंतर आरबीआयने या संदर्भात निवेदन जारी करून या अटकळांना खोडून काढले आहे. तसेच चलनी नोटांवरील महात्मा गांधी यांचा फोटो बदलण्याचा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत केवळ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे चित्र असलेल्या नोटा छापल्या जात होत्या. मात्र आता यात बदल होण्याची शक्यता आहे, हे वृत्त खोटे असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in