अंतिम फेरीचा जबरदस्त अनुभव असल्याने कोणत्या भावना नाही ; हार्दिक

अंतिम फेरीचा जबरदस्त अनुभव असल्याने कोणत्या भावना नाही ; हार्दिक
Published on

गुजरात टायटन्सचा संघ पहिल्याच आयपीएल हंगामामध्ये अंतिम फेरीत आल्याचा आनंद असला, तरी मला विशेष काही वाटत नाही. मला अंतिम फेरीचा जबरदस्त अनुभव असल्याने विजयाच्या क्षणी माझ्या मनात कोणत्या भावना आल्या नाहीत,” असे गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने सांगितले.

आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये मंगळवारी गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव केला. या सामन्यानंतर हार्दिक म्हणाला की, “मुंबई इंडियन्सकडून मी चार वेळा अंतिम फेरीत खेळलो. फायनलमध्ये कधीच पराभव स्वीकारावा लागला नाही.”

तो पुढे म्हणाला की, “संघातील सर्व २३ खेळाडूंचा मला अभिमान आहे. प्लेइंग इलेव्हनमधील सर्व खेळाडूंनी चमकदार कामगिरी करावी, असे संघाला वाटत होते. रशीदने संपूर्ण हंगामात शानदार कामगिरी केली. मला मिलरचाही अधिक अभिमान वाटतो. राजस्थान रॉयल्सच्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड मिलरने ६८ आणि हार्दिकने ४० धावा करत चौथ्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केली. त्यामुळे गुजरात टायटन्सला ७ गडी राखून मोठा विजय मिळाला.”

logo
marathi.freepressjournal.in