मथुरेतील इदगाह मशिदीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणास स्थगिती नाही ;सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका 

शाही ईदगाह मशीद परिसराचे न्यायालयाच्या देखरेखीखाली अधिवक्ते आणि आयुक्तांच्या तीन सदस्यीय पथकाकडून प्राथमिक सर्वेक्षण केले जाईल.
मथुरेतील इदगाह मशिदीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणास स्थगिती नाही ;सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका 

अलाहाबाद : मथुरेतल्या शाही ईदगाह मशिदीचे वैज्ञानिक सर्वेक्षण केले जाणार आहे. शाही ईदगाह मशीद ही कृष्ण जन्मभूमीवर उभारण्यात आली आहे, असा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. तसेच या मशीद परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी करणारी याचिकाही त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली होती. गुरुवारी दि. १४ डिसेंबर रोजी यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने वैज्ञानिक सर्वेक्षणास परवानगी दिली. गुरुवारी उच्च न्यायालयानेही मशीद परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली. त्यानंतर मुस्लीम पक्षकारांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने मशिदीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणास स्थगिती दिली नाही.

शाही ईदगाह मशीद परिसराचे न्यायालयाच्या देखरेखीखाली अधिवक्ते आणि आयुक्तांच्या तीन सदस्यीय पथकाकडून प्राथमिक सर्वेक्षण केले जाईल. आयुक्तांसह या सर्वेक्षणात किती लोक सहभागी होतील? सर्वेक्षण कधी सुरू केले जाईल? मशीद परिसरातील कोणकोणत्या भागांचे सर्वेक्षण केले जाईल? याबाबतचा निर्णय १८ डिसेंबर रोजी घेतला जाईल.

हिंदूंचा दावा

भगवान श्री कृष्ण विराजमान ट्रस्ट आणि इतर सात जणांनी विधीज्ञ हरी शंकर जैन, विष्णू शंकर जैन, प्रभाष पांडे आणि देवकी नंदन यांच्या माध्यमातून अलाहाबाद उच्च न्यायालयात मशिदीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाची मागणी करणाऱ्या याचिका दाखल केल्या होत्या. हिंदू संघटनांनी म्हटले आहे की, ही भूमी (शाही ईदगाह मशीद असलेली जागा) भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान आहे. येथे पूर्वी श्रीकृष्णाचे भव्य मंदिर होते. मुघल बादशाह औरंगजेबाच्या आदेशानंतर मुघलांनी हे मंदिर पाडून तिथे मशीद बांधली.

शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाआधी वाराणसीतल्या ज्ञानवापी मशीद परिसराचे एएसआय सर्वेक्षण करण्यात आले होते. न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयुक्तांच्या देखरेखीखालीच हेदेखील सर्वेक्षण करण्यात आले. दरम्यान, हिंदू पक्षकारांनी मागणी केली होती की शाही ईदगाह मशीद परिसराचे सर्वेक्षण करताना व्हिडीओ कॅमेऱ्याद्वारे चित्रण केले जावे. तसेच फोटोही काढावेत. हिंदू पक्षकारांनी दावा केल्याप्रमाणे शाही ईदगाह परिसरात हिंदूंची प्रतीके, चिन्हे आणि मंदिर पाडून त्याच जागी मशीद बांधल्याचे पुरावे शोधण्याचे काम या एएसआय सर्वेक्षणाद्वारे केले जाईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in