नोबेलविजेते शास्त्रज्ञ हिग्ज यांचे निधन

पीटर वेअर हिग्ज यांचा जन्म २९ मे १९२९ रोजी न्यूकॅसल अपॉन टायने, इंग्लंड येथे झाला. त्यांचे वडील ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनमध्ये (बीबीसी) ध्वनी अभियंता असल्यामुळे त्यांचे कुटुंब वारंवार स्थलांतरित झाले. किंग्ज कॉलेज लंडनमधून तीन पदवी घेतल्यानंतर ते एडिनबर्ग विद्यापीठात दाखल झाले.
नोबेलविजेते शास्त्रज्ञ  हिग्ज यांचे निधन

वॉशिंग्टन : नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी स्कॉटलंडमधील एडिनबर्ग येथे नुकतेच निधन झाल्याचे वृत्त ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने दिले आहे.

पीटर वेअर हिग्ज यांचा जन्म २९ मे १९२९ रोजी न्यूकॅसल अपॉन टायने, इंग्लंड येथे झाला. त्यांचे वडील ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनमध्ये (बीबीसी) ध्वनी अभियंता असल्यामुळे त्यांचे कुटुंब वारंवार स्थलांतरित झाले. किंग्ज कॉलेज लंडनमधून तीन पदवी घेतल्यानंतर ते एडिनबर्ग विद्यापीठात दाखल झाले. त्यांनी १९५४ मध्ये भौतिकशास्त्रात पीएचडी मिळवली. हिग्ज यांना प्रथम केमिस्ट बनायचे होते. पण पुढे ते सैद्धांतिक भौतिकशास्त्राकडे वळले. त्यांच्या सिद्धांताला २०१३ साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. आज त्यांचे नाव विज्ञानविश्वात अजरामर झाले आहे. वस्तुमानाच्या उत्पत्तीवरील त्याच्या संशोधनामुळे गेली अनेक वर्षे वैज्ञानिक जगतात खळबळ उडवून दिली होती.

विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी गृहितकांची उकल करण्यासाठी एका सूक्ष्म कणाच्या अस्तित्वाची गरज असल्याचे सास्त्रज्ञांना जाणवत होते. त्याला दैवी कण किंवा ‘गॉड पार्टिकल’ म्हणून ओळखण्यात आले. नंतर त्या कणाला ‘हिग्ज बोसॉन’ म्हणून ओळखण्यात आले. हे कण विश्वात खरोखरच अस्तित्वात आहेत की नाही, हे तपासून पाहण्यासाठी जगभरात बरेच संशोधन झाले. युरोपमध्ये लार्ज हॅड्रॉन कोलायडर नावाचा प्रचंड पार्टिकल अॅक्सिलरेटर प्रकल्प उभा करण्यात आला. त्यात अणूपेक्षा लहान सूक्ष्म कणांच्या शलाकांची वेगाने टक्कर घडवून अतिसूक्ष्म कणांची निर्मिती करण्यात आली. त्यातून ‘हिग्ज बोसॉन’चे (गॉड पार्टिकल) अस्तित्व सिद्ध झाल्याचा शास्त्रज्ञांचा दावा होता. या शोधामुळे हिग्ज यांचे नाव जगभर गाजले.

logo
marathi.freepressjournal.in