उत्तर सिक्कीममध्ये दरडी कोसळल्या; चुंगथांगमध्ये २०० पर्यटक अडकले

उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे चुंगथांगमध्ये जवळपास २०० पर्यटक अडकल्याची माहिती प्रशासनाने बुधवारी सकाळी दिली. मंगळवारी रात्री चुंगथांग-लाचेन या महत्त्वाच्या मार्गावर दरडी कोसळल्या. यामुळे लाचेनच्या दिशेने निघालेले पर्यटक मध्यंतरी अडकून पडले.
उत्तर सिक्कीममध्ये दरडी कोसळल्या; चुंगथांगमध्ये २०० पर्यटक अडकले
उत्तर सिक्कीममध्ये दरडी कोसळल्या; चुंगथांगमध्ये २०० पर्यटक अडकलेX
Published on

गंगटोक : उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे चुंगथांगमध्ये जवळपास २०० पर्यटक अडकल्याची माहिती प्रशासनाने बुधवारी सकाळी दिली. मंगळवारी रात्री चुंगथांग-लाचेन या महत्त्वाच्या मार्गावर दरडी कोसळल्या. यामुळे लाचेनच्या दिशेने निघालेले पर्यटक मध्यंतरी अडकून पडले.

अडकलेल्या पर्यटकांची रात्रभर राहण्याची सोय चुंगथांगमधील आयटीबीपी कॅम्प आणि एका गुरुद्वारामध्ये करण्यात आली होती. सीमा रस्ते संघटनेकडून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हवामानाचा अंदाज घेऊन आणि रस्ता सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतरच पर्यटकांना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार आहे.

काही पर्यटकांनी आपला पुढील प्रवास रद्द केला असून ते गंगटोकला परतले आहेत. लाचुंगकडे जाणारा रस्ता जो मंगळवारी रात्री बंद झाला होता, तो आता मोकळा करण्यात आला आहे. तेथील पर्यटकांना बुधवारी सकाळी सुरक्षितपणे गंगटोकला पाठवण्यात आले आहे. २०२३ मध्ये आलेल्या हिमनदी तलावाच्या महापुरानंतर लाचेन मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला होता.

logo
marathi.freepressjournal.in