मोदींना तिसऱ्या वेळी पंतप्रधान बनवण्यास ईशान्य भारत एकत्र येईल

- आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांचा विश्वास
मोदींना तिसऱ्या वेळी पंतप्रधान बनवण्यास ईशान्य भारत एकत्र येईल

गुवाहाटी : मणिपूरमध्ये हिंसाचार झाला असला तरी नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्या वेळी पंतप्रधान बनवण्यासाठी ईशान्य बारतातील जनता एकत्र येईल, असा विश्वास आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सर्मा यांनी व्यक्त केला.

सर्मा यांनी बुधवारी गुवाहटी येथे भाजपच्या विस्तारकांची बैठक घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, मणिपूरमध्ये हिंसाचार झाला असला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप राज्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत विजय मिळवेल. भाजपच्या शासनकाळात ईशान्य भारतात बरीच विकासकामे झाली आहेत. सिल्चर-जिरिबाम रस्ता झाला नसता तर आज राज्यात इंधनाचे भाव प्रति लिटर १००० रुपयांच्या पुढे गेले असते. त्यामुळे ईशान्य भारतातील जनता भाजपला विजयी करून देईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in