अयोध्या : अयोध्येत राममंदिर स्थापनेसाठी होणाऱ्या सोहळ्याचे महत्त्व लक्षात घेता तेथील रेल्वेस्थानकही विमानतळासारखे आधुनिक व सुविधायुक्त केले जात आहे. अशावेळी आता त्या स्तानकाचे नाव बदलून अयोध्याधाम असे केले जाणार आहे. या स्थानकाचे उद््घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० डिसेंबरला होणार आहे.