आता सहकारी बँकांमध्ये पैसे अडकलेल्या ठेवीदारांना दिलासा मिळणार

दि डिपॉझिट ॲण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) १७ सहकारी बँकांमधील पात्र ठेवीदारांना ऑक्टोबरमध्ये पैसे देणार
 आता सहकारी बँकांमध्ये पैसे अडकलेल्या ठेवीदारांना दिलासा मिळणार

सहकारी बँकांमध्ये पैसे अडकल्याने अडचणीत आलेल्या ठेवीदारांना आता दिलासा मिळणार आहे कारण दिवाळीपूर्वी त्यांना पैसे मिळणार आहेत. दि डिपॉझिट ॲण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) १७ सहकारी बँकांमधील पात्र ठेवीदारांना ऑक्टोबरमध्ये पैसे देणार आहे. या १७ पैकी आठ सहकारी बँका महाराष्ट्रातील आहेत. डीआयसीजीसी ही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मालकीची उपकंपनी आहे. ही कंपनी बँकांच्या ठेवीदारांच्या पाच लाख रुपयांचा विमा संरक्षण देते. एकूण १७ सहकारी बँकांमधील आठ महाराष्ट्रातील, चार उत्तर प्रदेशमधील, कर्नाटाकील दोन आणि नवी दिल्ली, आंध्र प्रदेश व प. बंगालमधील एका सहकारी बँकेचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in