एनटीपीसी कंपनीला ५१९९ कोटी रुपये नफा झाला

एनटीपीसी कंपनीला ५१९९ कोटी रुपये नफा झाला
Published on

मार्चमध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीत एनटीपीसी कंपनीला ५१९९ कोटी रुपये नफा झाला आहे. कंपनीच्या नफ्यात १२ टक्क्याने वाढ झाली आहे. कंपनीला ३१ मार्च २०२१ मध्ये ४६४९.४९ कोटी रुपये नफा झाला होता.

कंपनीला मार्चमध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीत ३७७२४.४२ कोटी रुपये महसूल मिळाला होता. गेल्यावर्षी कंपनीला ३१,६८७.२४ कोटी रुपये महसूल मिळाला होता. २०२०-२१ कंपनीला वार्षिक १४९६९.४० कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्यापेक्षा २०२१-२२ मध्ये कंपनीला १६९६०.२९ कोटी रुपये नफा झाला होता. कंपनीला १३४९९४.३१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्यावर्षी या कालावधीत कंपनीला ११,५५४६.८३ कोटी रुपये महसूल मिळाला होता.

कंपनीच्या संचालक मंडळाने ३ रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये कंपनीने ४ रुपये प्रति लाभांश दिला होता. विजेचे दर युनिटला ३.९८ रुपये राहिले. तत्पूर्वीच्या वर्षात ते ३.७७ रुपये होते. तसेच वीजनिर्मिती २९९.१८ बीयू झाली. २०२०-२१ मध्ये २७०.९० बीयू वीजनिर्मिती कंपनीने केली होती.

logo
marathi.freepressjournal.in