भुवनेश्वर : ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक हे आपल्या हिंजीली या पारंपरिक मतदारसंघासह बोलनगीर जिल्ह्यातील कांताबानजी मतदारसंघातूनही विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत. पटनाईक यांनी बुधवारी स्वत:च तशी घोषणा केली आहे.
ओदिशा विधानसभा निवडणुकीसाठी पटनाईक यांनी बुधवारी नऊ उमेदवारांच्या नावांची पाचवी यादी जाहीर केली. गेल्या निवडणुकीतही पटनाईक दोन मतदारसंघातून लढले होते. हिंजीली आणि बिजेपूर या दोन्ही जागा त्यांनी जिंकल्या होत्या.
पटनाईक यांनी बुधवारी जाहीर केलेल्या नऊ उमेदवारांमध्ये सहा महिला आणि चार जण अन्य पक्षातून आलेले आहेत. तर चार विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.