ओदिशातील मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी ‘सुकरू’चे आत्मसमर्पण; ५५ लाखांचे होते बक्षीस

ओदिशातील ‘मोस्ट वॉन्टेड’ नक्षलवादी आणि राज्य समितीचा सदस्य असलेल्या सुकरू याने मंगळवारी कंधमाल जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. सुकरूवर ५५ लाख रुपयांचे बक्षीस होते, अशी माहिती पोलिलांनी दिली.
ओदिशातील मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी ‘सुकरू’चे आत्मसमर्पण; ५५ लाखांचे होते बक्षीस
Published on

भुवनेश्वर : ओदिशातील ‘मोस्ट वॉन्टेड’ नक्षलवादी आणि राज्य समितीचा सदस्य असलेल्या सुकरू याने मंगळवारी कंधमाल जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. सुकरूवर ५५ लाख रुपयांचे बक्षीस होते, अशी माहिती पोलिलांनी दिली.

शस्त्रासह शरणागती

सुकरूने आपल्याकडील एक एके-४७ रायफल पोलिसांकडे सुपूर्द केली. त्याच्यासोबत इतर चार नक्षलवादी कॅडर्सनीही आत्मसमर्पण केले आहे. मूळचा मालकनगिरी जिल्ह्यातील असलेला सुकरू ओदिशात सक्रिय असलेल्या शेवटच्या काही प्रमुख नक्षलवादी नेत्यांपैकी एक मानला जात होता.

मोहिमेचा दबाव

केंद्र सरकारने ३१ मार्चपर्यंत नक्षलवादाचे उच्चाटन करण्याचे जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर कंधमाल, रायगडा आणि कालाहंडी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात सुरक्षा दलांनी मोहीम तीव्र केली होती. विशेष ऑपरेशन्स ग्रुप, सीआरपीएफ, जिल्हा स्वयंसेवक दल आणि बीएसएफ यांच्या संयुक्त पथकांनी सुकरू आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी जंगलात वेढा घातला होता. त्यानंतर वाढत्या दबावामुळे अखेर सुकरूने शस्त्रे खाली ठेवण्याचा निर्णय घेतला.

ओदिशातील नक्षलवादी चळवळीसाठी हा एक मोठा धक्का मानला जात असून, या आत्मसमर्पणानंतर नक्षलग्रस्त भागात शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in