ओदिशात विकासासाठी ‘डबल इंजिन’ सरकार हवे; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

बेरहामपूर, आस्का, भुवनेश्वर, कंधमाल आणि पुरी या पाच लोकसभा विभागातील पक्षाचे कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.
ओदिशात विकासासाठी ‘डबल इंजिन’ सरकार हवे; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

बेरहमपूर (ओदिशा) : देशाच्या इतर भागांसह स्थिर प्रगतीसाठी ओदिशामध्ये ‘डबल इंजिन’ सरकार स्थापित केले जावे, असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी बेरहामपूर शहराजवळील अंबापुआ येथे एका जाहीर सभेत बोलताना व्यक्त केले.

बेरहामपूर, आस्का, भुवनेश्वर, कंधमाल आणि पुरी या पाच लोकसभा विभागातील पक्षाचे कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. कोणतीही शक्ती यावेळी भाजपला ओदिशात सरकार स्थापन करण्यापासून रोखू शकत नाही,  असे ते म्हणाले.

त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक घराघरात जाऊन मोदी सरकारने गरीब, शेतकरी, मजूर, विद्यार्थी आणि युवकांसाठी केलेल्या कल्याणकारी उपायांची माहिती द्यावी, असे आवाहन केले. सिंह यांनी भाजप कार्यकर्त्यांना ओडिशात ‘डबल इंजिन सरकार’ बनवण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले. आम्ही केवळ लोकसभा निवडणुकीतच चांगली कामगिरी करणार नाही, तर विधानसभा निवडणुकीतही भाजप चांगली कामगिरी करील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

ओदिशातील विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबतच होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ओदिशाकडे विशेष लक्ष असल्याचा दावा करून सिंह म्हणाले की, पूर्वीच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने १० वर्षांत राज्याला केवळ ३ लाख कोटी रुपये दिले होते, तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर राज्याला १८ लाख कोटी रुपये दिले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in