प्रमुख पायाभूत क्षेत्रांचा १४ महिन्यांचा नीचांक

कच्चे तेल, वीज, पोलाद आणि सिमेंट यांसारख्या क्षेत्रांच्या खराब कामगिरीमुळे डिसेंबर २०२३ मध्ये आठ प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांची वाढ १४ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजे ३.८ टक्क्यांवर आली आहे.
प्रमुख पायाभूत क्षेत्रांचा १४ महिन्यांचा नीचांक

नवी दिल्ली : कच्चे तेल, वीज, पोलाद आणि सिमेंट यांसारख्या क्षेत्रांच्या खराब कामगिरीमुळे डिसेंबर २०२३ मध्ये आठ प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांची वाढ १४ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजे ३.८ टक्क्यांवर आली आहे. ही अधिकृत आकडेवारी बुधवारी जाहीर झाली.

नोव्हेंबरमध्ये प्रमुख क्षेत्र (कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज) वाढ ७.९ टक्के होती. तर डिसेंबर २०२२ मध्ये तो ८.३ टक्के होता. शेवटचा नीचांक ऑक्टोबर २०२२ मध्ये ०.९ टक्का नोंदवला गेला होता.

एप्रिल-डिसेंबर २०२३-२४ मध्ये आठ क्षेत्रांची वाढ वार्षिक आधारावर ८.१ टक्के इतकी होती. तर डिसेंबर २०२३ मध्ये कोळसा, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज उत्पादनातील वाढीचा दर कमी झाला. केवळ नैसर्गिक वायूचे उत्पादन डिसेंबर २०२२ मधील २.६ टक्क्यांवरून वरील महिन्यात ६.६ टक्क्यांनी वाढले.

औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) आठ प्रमुख क्षेत्रे ४०.२७ टक्के योगदान देत असल्याने या आकडेवारीला खूप महत्त्व आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन १ टक्क्यांनी घसरले. वीज, पोलाद आणि सिमेंट उत्पादनातील वाढीचा दर डिसेंबर २०२२ मध्ये अनुक्रमे १०.४ टक्के, १२.३ टक्के आणि ९.५ टक्क्यांच्या तुलनेत डिसेंबर २०२३ मध्ये ०.६ टक्का, ५.९ टक्के आणि १.३ टक्क्यांवर घसरला.

अदिती नायर, चीफ इकॉनॉमिस्ट, हेड - रिसर्च अँड आउटरीच, इक्रा लि. यांनी सांगितले की, मुख्य क्षेत्राचा विस्तार निम्मा घसरला असून १४ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. डिसेंबर २०२३ मधील प्रमुख क्षेत्राच्या वाढीतील घसरणीमुळे आम्ही त्या महिन्यासाठी आयआयपी १-३ टक्क्यांपर्यंत कमी होईल.

logo
marathi.freepressjournal.in