Air India Pee-Gate : विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका प्रकरणात ट्विस्ट; आरोपी म्हणतो, महिलेनेच...

एअर इंडिया (Air India Pee-Gate) विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका केलेला आरोपी शंकर मिश्राने अजब दावे केले
Air India Pee-Gate : विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका प्रकरणात ट्विस्ट; आरोपी म्हणतो, महिलेनेच...

काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या (Air India) विमानामध्ये महिलेवर एका पुरुषाने लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. (Air India Pee-Gate) या प्रकरणाची दखल टाटा समूहानेदेखील घेतली आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर दिल्ली पोलिसांनी शंकर मिश्राला बंगळुरूमधून अटक केली. त्यानंतर त्याला नुकतेच दिल्ली न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. मात्र, त्याने स्वतःवरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. उलट त्याच्या वकिलाने सांगितले की, शंकर मिश्रा त्याजागेवर जाणे शक्यच नव्हते, कारण तक्रारदार महिलेची सीट ब्लॉक करण्यात आली होती. आरोप करणाऱ्या महिलेने स्वत:वरच लघुशंका केली," असा दावा केला.

शंकर मिश्रा यांची बाजू मांडताना त्यांचे वकील म्हणाले की, "तक्रारदार महिलेच्या जागेपर्यंत पोहचणे शक्य नव्हते. कारण, त्यांची सीट ब्लॉक होती. याउलट महिलेने स्वत:वरच लघुशंका केली. याचा आरोप त्यांनी शंकर मिश्रा यांच्यावर लावला. कारण, त्यांना मूत्रपिंडातील असंतुलनाचा आजार आहे. त्या एक कथ्थक नृत्यांगणा असून ८० टक्के कथ्थक नृत्यांगणांना असा त्रास उद्भवत असतो." असा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपी शंकर मिश्रा हा अमेरिकेतील आर्थिक क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'वेल्स फर्गो' या कंपनीमध्ये काम करत होता. या घटनेनंतर त्याला कामावरून काढून टाकण्यात आले.

यापूर्वी आरोपी शंकर मिश्राने पटियाला हाऊस कोर्टात सांगितले होते की, "दारूच्या नशेमध्ये मी स्वत:वर नियंत्रण ठेवू शकलो नाही." असे त्याने कबूल केले होते. यानंतर त्याचे वडील श्याम मिश्रा म्हणाले की, "माझ्या मुलावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. पीडितेने भरपाई मागितली होती, तीही आम्ही दिली, मग काय झाले माहीत नाही." असा आरोप तक्रारदार महिलेवर केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in