बोटीचे ओमान कनेक्शन समोर, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली 'ही' माहिती

नौदलाच्या गुप्तचर यंत्रणेकडून पोलिसांना या बोटीची माहिती लगेच मिळाली. रेकॉर्डवर ही बोट यूकेची असल्याचे आढळून आले
बोटीचे ओमान कनेक्शन समोर, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली 'ही' माहिती
Published on

रायगडमध्ये संशयास्पद बोटी सापडल्याने राज्यात सकाळपासून चांगलीच खळबळ उडाली. गोकुळाष्टमी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढा शस्त्रसाठा असलेली बोट सापडल्यानंतर यंत्रणा सतर्क झाली आहे. श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर समुद्रकिनारी ही बोट सापडली. या बोटीचे ओमान कनेक्शन असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही बोट यूकेमध्ये नोंदणीकृत आहे. त्याची पोलिसांकडून पडताळणी करण्यात आली आहे. यासोबतच पोलिसांनी 2 जणांची माहिती घेतली आहे. त्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या दोन्ही व्यक्ती इंडोनेशियाचे नागरिक असल्याचे समोर आले आहे. तसेच, पोलिसांना ऑस्ट्रेलियन नागरिकाची काही कागदपत्रे सापडली आहेत. त्यानंतर पोलिसांनी शस्त्रांचा साठा जप्त केला. कागदपत्रे जप्त करण्यात आली. नौदलाच्या गुप्तचर यंत्रणेकडून पोलिसांना या बोटीची माहिती लगेच मिळाली. रेकॉर्डवर ही बोट यूकेची असल्याचे आढळून आले. यासोबतच एके ४७ च्या बॉक्सवर मेरिटम सिक्युरिटी कंपनीचा स्किटर होता. त्यामुळे ही बोट नेपच्यून सिक्युरिटी मरीनची असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे या दुर्घटनेशी दहशतवादी संबंध असल्याचा कोणताही प्राथमिक पुरावा अद्याप मिळालेला नाही.

logo
marathi.freepressjournal.in