नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी जम्मू-काश्मीर व लडाखसाठी काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचे जागावाटप पूर्ण झाले आहे, अशी घोषणा नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी केली.
ते म्हणाले की, जम्मूच्या दोन जागांवर व लडाखच्या एका जागेवर काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवतील. त्याला नॅशनल कॉन्फरन्स पाठिंबा देईल, तर काश्मीरच्या तीन जागा नॅशनल कॉन्फरन्स लढवणार आहे. त्याला काँग्रेस पाठिंबा देणार आहे. अनंतनाग-राजौरी येथून मेहबुबा मुफ्ती, माजी खासदार मीर फयाज हे बारामुल्लातून निवडणूक लढवतील.