
नवी दिल्ली : भारतात गेल्या दहा दिवसांत तांदळाचे दर २० टक्क्याने वाढले आहेत. त्यामुळे सरकारने बासमती सोडून अन्य सफेद तांदूळ निर्यात करण्यास बंदी घातली आहे. याबाबतची अधिसूचना परकीय व्यापार महासंचालकांनी (डीजीएफटी) काढली आहे.
निर्यात धोरणात बासमती सोडून अन्य तांदळांची निर्यात करता येणार नाही. ही अधिसूचना जारी करण्यापूर्वी जहाजावर तांदूळ भरला असल्यास त्याची निर्यात करायला परवानगी मिळेल. तसेच सरकारने दुसऱ्या देशात तांदूळ निर्यातीला परवानगी दिलेली असेल. तसेच अन्य देशांची अन्न सुरक्षा लक्षात घेऊन तांदूळ निर्यात केली जात असल्यास त्याला परवानगी मिळेल. मात्र, अन्य सरकारकडून अन्न सुरक्षेसाठी तांदूळ आयातीची विनंती केलेली असल्यास निर्यातीला परवानगी देण्यात येईल. गेल्या दहा दिवसांपासून भारतात तांदळाच्या दरात वाढ होत आहे. तांदळाचे दर २० टक्क्याने वाढले आहेत.