देशाच्या विदेशी गंगाजळीत पुन्हा एकदा घट

२० मे रोजी संपलेल्या आठवड्यात तो ४.२३ अब्ज डॉलर्सने वाढून ५९७.५०९ अब्ज डॉलर्स झाला होता
देशाच्या विदेशी गंगाजळीत पुन्हा एकदा घट

देशाच्या विदेशी गंगाजळीत पुन्हा एकदा घट झाली आहे. तीन जून रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा ६०१.०५७ अब्ज डॉलर्सवर घसरला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या आकडेवारीनुसार, त्यात ३०६ दशलक्ष डॉलर्सची घट झाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, मागील आठवड्यात परकीय चलनाचा साठा ३.८५४ अब्ज डॉलरने वाढून ६०१.३६३ अब्ज डॉलर झाला होता, तर २० मे रोजी संपलेल्या आठवड्यात तो ४.२३ अब्ज डॉलर्सने वाढून ५९७.५०९ अब्ज डॉलर्स झाला होता.

ही दिलासादायक बाब आहे की, घसरणीनंतरही सध्या परकीय चलनाचा साठा ६०० अब्ज डॉलर्सवर आहे. याआधी, सलग १० आठवड्यांच्या घसरणीमुळे तो एका महिन्यासाठी ६०० अब्ज डॉलर्सच्या खाली गेला होता. परंतु, २० आणि २७ मे रोजी संपलेल्या आठवड्यात त्यात तेजी आली. तीन जून रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा कमी होण्याचे कारण परकीय चलन मालमत्तेतील घट हे आहे, जो एकूण गंगाजळीचा महत्त्वपूर्ण घटक आहे.

आकडेवारीनुसार, रिपोर्टिंग आठवड्यात परकीय चलन मालमत्ता (एफसीए) २०८ दशलक्ष डॉलर्सने घसरून ५३६.७७९ अब्ज डॉलर्स झाली.

डॉलरमध्ये व्यक्त केलेल्या विदेशी चलन साठ्यामध्ये ठेवलेल्या परकीय चलनाच्या मालमत्तेमध्ये युरो, पौंड आणि येन यांसारख्या गैर-यूएस चलनांमधील मूल्यवृद्धी किंवा घसारा यांचा समावेश होतो. इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (आयएमएफ) सोबतचे स्पेशल ड्रॉइंग राइट्स (एसडीआर) २८ दशलक्ष डॉलर्सने घसरून १८.४१ अब्ज डॉलर्स झाले आहेत, असे आरबीआयने सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in