ओएनसी चा तिमाही नफा १४ टक्क्यांनी घसरून ९,५३६ कोटींवर

कंपनीने या तिमाहीत उत्पादन आणि विक्री केलेल्या कच्च्या तेलाची किंमत ६.४ टक्क्यांनी घसरून ८१.५९ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलवर आल्याने नफ्यात घसरण झाली.
ओएनसी चा तिमाही  नफा १४ टक्क्यांनी घसरून ९,५३६ कोटींवर
PM

नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने (ओएनजीसी) रविवारी ३१डिसेंबरला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात १४ टक्क्यांनी घट झाल्याचे जाहीर केले. तेल आणि वायूच्या किमती कमी झाल्यामुळे नफा घसरल्याचे सांगण्यात येते.

कंपनीला २०२३-२४ आर्थिक वर्षातील तिसरी तिमाही ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ मध्ये ९,५३६ कोटी रुपयांचा नफा मिळाला असून मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील ११,०४५ कोटींच्या तुलनेत त्यात १३.७ टक्क्यांनी घट झाली, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

कंपनीने या तिमाहीत उत्पादन आणि विक्री केलेल्या कच्च्या तेलाची किंमत ६.४ टक्क्यांनी घसरून ८१.५९ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलवर आल्याने नफ्यात घसरण झाली. गॅसची किंमतही २४.२ टक्क्यांनी कमी होऊन ६.५ डॉलर प्रति एमएमबीटीयू होती.

रिफायनरीजमध्ये पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनात रूपांतरित होणाऱ्या कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट आणि वीज निर्मिती, खत निर्मिती, सीएनजीमध्ये रूपांतरित आणि स्वयंपाकासाठी पाइपद्वारे वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूचे उत्पादनातून नफ्यात घट झाली.

logo
marathi.freepressjournal.in