रश्मिकाच्या डीपफेक प्रकरणी एकास अटक

अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या मुख्य आरोपीला दिल्ली पोलिसांनी शनिवारी आंध्र प्रदेशातून अटक केली आहे.
रश्मिकाच्या डीपफेक प्रकरणी एकास अटक

नवी दिल्ली : अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या मुख्य आरोपीला दिल्ली पोलिसांनी शनिवारी आंध्र प्रदेशातून अटक केली आहे. पोलिसांनी याआधी बिहारमधील एका १९ वर्षीय तरुणाची चौकशी केली आहे.

रश्मिका मंदानाच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत होती. त्या मुलीचा चेहरा हुबेहुब रश्मिकासारखा दिसत होता.

या व्हिडीओमध्ये ती मुलगी लिफ्टमध्ये शिरताना दिसत होती आणि तिने अतिशय रिलिव्हिंग ड्रेस घातला होता. हा व्हिडीओ मॉर्फ केलेला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in