मनेका गांधींवर शंभर कोटींचा मानहानी दावा इस्कॉनबाबत भाष्य भोवले

मनेका यांचे वक्तव्य निराधार आणि खोटे असल्याचे इस्कॉनने म्हटले
मनेका गांधींवर शंभर कोटींचा मानहानी दावा इस्कॉनबाबत भाष्य भोवले
Published on

नवी दिल्ली : द इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस अर्थात इस्कॉन या संस्थेने भाजप खासदार मनेका गांधी यांच्यावर १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. इस्कॉन कसायांना गाई विकते, असा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच मनेका गांधी यांनी व्हायरल केला होता.

मनेका गांधी या प्राणी हक्कांसाठी चळवळ चालवतात. त्यांनी इस्कॉन गोशाला चालवते. त्यासाठी सरकारकडून खूप मोठी मदत आणि जमीन मिळवते, मात्र म्हाताऱ्या गाई कसायांना विकते, असे विधान त्यांनी या व्हिडीओमध्ये केले होते. आपल्या गाई कसायांना विकतात आणि रस्त्याने हरे राम हरे कृष्ण म्हणत भटकतात. तसेच आपले जीवन गाईच्या दुधावर अवलंबून असल्याचे सांगत फिरतात, असेही मनेका गांधी म्हणाल्या आहेत. इस्कॉन संस्थेने त्यांच्या या व्हिडीओची गंभीर दखल घेतली असून १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. मनेका यांचे वक्तव्य निराधार आणि खोटे असल्याचे इस्कॉनने म्हटले आहे. तसेच मनेका गांधी यांचा अनंतपूर गोशालेला भेट दिल्याचा दावा देखील इस्कॉनने खोडून काढला आहे.

logo
marathi.freepressjournal.in