संसदेत घुसखोरी करणाऱ्यांपैकी एक जण महाराष्ट्रातील?

22 वर्षापूर्वी संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्लाच्या दिवशीच घुसखोरी केल्यानं आणि गॅलरीतून सदस्यांच्या बेंचवर उड्या मारल्याने एकच गोंधळ उडाला.
संसदेत घुसखोरी करणाऱ्यांपैकी एक जण महाराष्ट्रातील?

आज संसदेवरील हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण झाली असताना एक धक्कादायक घटना घडली. संसदेच्या लोकसभा या सभागृहाच्या गॅलरीतून दोन जणांनी सभागृहात उड्या घेतल्याने एकच खळबळ उडाली. तर दुसरीकडे सभागृहाच्या बाहेरच्या परिसरातून देखील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या तिन्ही घुसखोरांपैकी एकजण हा महाराष्ट्रातील लातूर येथील असल्याचं सांगितलं जात असून त्याचे नाव अमोल शिंदे असल्याचं समजते.

मीडिया रिपोर्टनुसार, या तिन्ही घुसखोरांनी म्हैसूर येथील भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावावर लोकसभा व्हिजीटर पास घेऊन आले होते. घुसखोरांमध्ये एका तरुणीचाही समावेश असल्याचे समजते, तिचं नाव नीलम सिंग आणि अन्य एकाचं नाव सागर आहे.

22 वर्षापूर्वी झालेल्या हल्लाच्या दिवशीच या तरुणांनी संसदेत घुसखोरी केल्यानं आणि गॅलरीतून सदस्यांच्या बेंचवर उड्या मारल्याने एकच गोंधळ उडाला. यामुळे संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. दरम्यान, या तरुणांनी हे कृत्य का केलं? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in