पंतप्रधान मोदी-जिनपिंग यांच्यात चालता चालता चर्चा

सीमेवरील तणाव कमी करायला भारत-चीन प्रयत्न करणार
पंतप्रधान मोदी-जिनपिंग यांच्यात चालता चालता चर्चा

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात हिंसाचार झाल्यापासून भारत-चीनचे संबंध अधिक तणावपूर्ण झाले असतानाच ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्यात गुरुवारी चालता चालता चर्चा झाली आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्याचे प्रयत्न वेगाने करायला आदेश देण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सहमती बनली, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी दिली.

पंतप्रधान मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील न सुटलेल्या मुद्यांवर चिंता बोलून दाखवली. दोन्ही देशांतील संबंध सामान्य ठेवण्यासाठी सीमावर्ती भागात शांतता राखणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेचा सन्मान राखणे आवश्यक आहे, असे क्वात्रा यांनी सांगितले.

ब्रिक्स बिझनेस फोरम हा ब्रिक्स करारातील महत्त्वाचा भाग आहे. लवचिक, सर्वसमावेशक पुरवठा साखळी तयार करण्याबाबत पंतप्रधानांनी चर्चा केली. ब्रिक्स देशातील परस्पर विश्वास व पारदर्शकता यावर चर्चा झाली.

logo
marathi.freepressjournal.in