
नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेच्या पहिले हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपले. २५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात २० बैठका झाल्या. लोकसभा व राज्यसभेचे एकूण १०५ तास काम झाले. लोकसभेची उत्पादकता ५७.८७ टक्के, तर राज्यसभेची उत्पादकता ४१ टक्के नोंदली गेली. संसदेत चार विधेयके मांडण्यात आली. मात्र, एकही विधेयक मंजूर झाले नाही.
‘एक देश-एक निवडणूक’ हे बहुचर्चित विधेयक मांडण्यात आले. या विधेयकाच्या छाननीसाठी ३९ सदस्यांची संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीला संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात याबाबत अहवाल द्यावा लागणार आहे.
लोकसभेत २० बैठका झाल्या, त्या ६२ तास चालल्या. लोकसभेची उत्पादकता ५७.८७ टक्के झाली. भारताच्या राज्यघटनेला ७५ वर्षे झाल्यानिमित्त १३ व १४ डिसेंबरला विशेष चर्चा झाली. तसेच शून्य प्रश्नोत्तराच्या काळात ६१ तारांकित प्रश्नांची तोंडी उत्तरे देण्यात आली.