‘ओपेक’ नोव्हेंबरपासून तेल उत्पादन वाढवणार

‘ओपेक प्लस’ समूहाने नोव्हेंबरपासून दररोज १.३७ लाख बॅरल तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत पुरवठ्याच्या अतिरेकाची शक्यता कायम असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘ओपेक’ नोव्हेंबरपासून तेल उत्पादन वाढवणार
Published on

लंडन/मॉस्को : ‘ओपेक प्लस’ समूहाने नोव्हेंबरपासून दररोज १.३७ लाख बॅरल तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत पुरवठ्याच्या अतिरेकाची शक्यता कायम असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तेल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना (ओपेक) तसेच रशिया आणि काही लहान उत्पादक देशांचा समावेश असलेल्या या गटाने चालू वर्षभरात तेल उत्पादन लक्ष्य एकूण २.७ दशलक्ष पिंप प्रति दिवसांनी वाढवले आहे. जे जागतिक मागणीच्या सुमारे २.५ टक्क्यांइतके आहे. शुक्रवारी ब्रेंट क्रूडचे दर प्रती पिंप ६५ डॉलर्सच्या कमी झाले. कारण बहुतांश विश्लेषकांनी चौथ्या तिमाहीत आणि २०२६ मध्येही मागणीतील मंदी आणि अमेरिकेतील उत्पादनवाढ यामुळे पुरवठ्याचा अतिरेक होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

सध्या तेलाच्या किंमती वर्षाच्या ८२ डॉलर्स प्रति पिंपाच्या तुलनेत खाली असल्या तरी मे महिन्यातील ६० डॉलर्स प्रति बॅरलपेक्षा अधिक आहेत.

बैठकीपूर्वी, ‘ओपेक प्लस’मधील दोन मोठे उत्पादक रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात वेगवेगळी मते होती, असे सूत्रांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in