चेहेऱ्यावरील ओपन पोअर्समुळे चेहरा निस्तेज, बेरूप दिसतोय? चेहेऱ्यावरील 'ग्लो' परत मिळवण्यासाठी 'या' टिप्स नक्की वापरा

जर चेहऱ्यावरील ओपन पोअर्स असतील, तर चेहरा निस्तेज, बेरूप दिसू लागतो. ही समस्या कमी करण्यासाठी साधे सोपे आणि तितकेच प्रभावी उपाय नक्की करा
चेहेऱ्यावरील ओपन पोअर्समुळे चेहरा निस्तेज, बेरूप दिसतोय? चेहेऱ्यावरील 'ग्लो' परत मिळवण्यासाठी 'या' टिप्स नक्की वापरा

आपला चेहरा सुंदर दिसावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण जर चेहऱ्यावरील ओपन पोअर्स आणि तेही मोठी असतील, तर चेहरा निस्तेज, बेरूप दिसू लागतो. ज्यांची त्वचा तेलकट असते, अश्या व्यक्तींमध्ये ही समस्या प्रामुख्याने आढळून येते. तसेच मुलांपेक्षा मुलींमध्ये ही समस्या जास्त आढळून येते. जसजसे वय वाढेल, तसतशी ही पोअर्सही मोठी होत जातात. ही समस्या कमी करण्यासाठी काही उपाय अवलंबता येतील. हे उपाय अगदी साधे सोपे, पण तितकेच प्रभावी देखील आहेत.

केळे खाल्ल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतोतचं पण, त्याचबरोबर केळे आपल्या त्वचेसाठी देखील मोठे फायद्याचे आहे. केळ्याने आपल्या त्वचेचतील खराब झालेल्या टिश्यूज ना दुरुस्त करण्यास मदत मिळते. तसेच याच्या वापराने त्वचेला नैसर्गिक आर्द्रता मिळून, त्वचा चमकदार बनण्यास मदत होते. त्यामुळे कुस्करलेले केळे आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील ओपन पोअर्स कमी होऊन, त्वचा पुन्हा सतेज, नितळ दिसू लागते.

ओपन पोअर्स कमी करण्यासाठी काकडी आणि लिंबाचा वापर केल्यानेही फायदा होतो. यासाठी काकडीच्या रसामध्ये काही थेंब लिंबाचा रस घालून, हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. हा उपाय सातत्याने केल्यास काही दिवसांतच ओपन पोअर्स नाहीशी होण्यास मदत मिळेल. तसेच दुध आणि ओट्स यांच्या मिश्रणाने देखील ओपन पोअर्स नाहीशी होतील. हा पॅक बनविण्यासाठी दोन चमचे ओट्समध्ये एक चमचा मध आणि एक चमचा गुलाबजल आणि थोडेसे दुध घालावे. हे मिश्रण एकत्र करून याची घट्ट पेस्ट बनवावी. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर दहा मिनिटे लावून ठेवावी. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वछ धुवावा. या पॅकच्या वापराने ओपन पोअर्स नाहीशी होतीलच, शिवाय चेहऱ्यावर अन्य डाग असल्यास ते ही नाहीसे होतील.

logo
marathi.freepressjournal.in