Operation Ajay : इस्त्रायलमध्ये अडकलेले भारतीय देशात परतणार ; युद्धामुळे १८ हजार भारतीय इस्रायलमध्ये अडकून

भारत सरकारनं नुकतीच 'ऑपरेशन अजय'ची घोषणा केली आहे.
Operation Ajay : इस्त्रायलमध्ये अडकलेले भारतीय देशात परतणार ; युद्धामुळे १८ हजार भारतीय इस्रायलमध्ये अडकून

इस्त्राइल-पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रातईलमध्ये अडकेल्या भारतीयांच्या बचावासाठी गेलेलं भारत सरकारचं विमान लवकरच मायदेशी परतणार आहे. हे विमान कधी आणि किती वाजता उड्डाण करणार याचा तपशील समोर आला आहे. एएनआय या वृत्त संस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

इस्रायलमध्ये विविध कारणाने वास्तव्याला असलेले १८,०० भारतीय नागरिक या युद्धामुळे तिकडे अडकून पडले आहेत. या ठिकाणी पॅलेस्टाईनच्या हमास या अतेरिकी गटानं इस्रायलवर ड्रोन हल्ले केल्यानंतर इथ युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं नुकतीच 'ऑपरेशन अजय'ची घोषणा केली आहे.

'ऑपरेशन अजय'नुसार इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी पहिल विमान दाखल झालं आहे. जे भारतीय नागरिक इस्रायलमध्ये अडकून पडले

आहेत त्यांना नोंदणीचं आवाहन करण्यात आलं आहे. या भारतीयांना मायदेशात घेऊन येणारी विमानाची पहिली खेपल आज संध्यकाळी इस्रायलची राजधानी तेल अविव इथून उड्डाण करणार आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 'एक्स'या सोशलमीडिया प्लॅटफार्मवर 'ऑपरेशन अजय' संदर्भात माहिती दिली होती. "मायदेशात परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी ऑपरेशन अजय लॉन्च करण्यात आलं आहे. एक विशेष विमान आणि इतर सेवा यांची सोय करण्यात आली आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी आम्ही पूर्ण कटिबद्द आहोत", असं एस जयशंकर यांनी म्हटलं होतं.

logo
marathi.freepressjournal.in