'ऑपरेशन सिंदूर'नंतर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केल्याचा आरोप; पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीला अटक

पुण्यात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या शर्मिष्ठा पानोली नावाच्या विद्यार्थिनीला शुक्रवारी रात्री कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली. या विद्यार्थिनीवर ऑपरेशन सिंदूरवरील पोस्टला उत्तर देताना आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.
'ऑपरेशन सिंदूर'नंतर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केल्याचा आरोप; पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीला अटक
Published on

गुरुग्राम : पुण्यात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या शर्मिष्ठा पानोली नावाच्या विद्यार्थिनीला शुक्रवारी रात्री कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली. या विद्यार्थिनीवर ऑपरेशन सिंदूरवरील पोस्टला उत्तर देताना आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.

या विद्यार्थिनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला होता, ज्यामध्ये एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करून अपमानजनक टिप्पणी केली होती. दरम्यान, या विद्यार्थिनीने हा व्हिडीओ नंतर डिलीट केला होता. या प्रकरणी कोलकाता येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर कोलकाता पोलिसांनी तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. हे प्रकरण शर्मिष्ठा पानोली नावाच्या तरुणीच्या इन्स्टाग्राम व्हिडीओशी संबंधित आहे. तरुणीच्या व्हिडीओमुळे एका विशिष्ट समुदायाच्या सदस्यांच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्यांनी दावा केला की, शर्मिष्ठा पानोली आणि तिचे कुटुंब कथितपणे फरार झाल्यामुळे तिला कायदेशीर नोटीस बजावण्याचे प्रयत्न करूनही तिच्यापर्यंत नोटीस पोहोचवता आली नाही.

बिनशर्त माफी

दरम्यान या वादानंतर, शर्मिष्ठा पानोलीने सोशल मीडियावर बिनशर्त माफी मागितली होती. याचबरोबर इन्स्टाग्रामवरील तिचे व्हिडीओ आणि पोस्टही हटवल्या होत्या. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये शर्मिष्ठा म्हणाली होती की, या प्रकरणी मी बिनशर्त माफी मागते. मी जे काही मांडले त्या माझ्या वैयक्तिक भावना आहेत. मी कधीही कोणालाही जाणूनबुजून दुखावू इच्छित नव्हते, म्हणून जर कोणी दुखावले असेल तर मी त्याबद्दल माफी मागते. मला सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. यापुढे, मी सार्वजनिक पोस्ट करताना सावध राहीन. पुन्हा एकदा, कृपया माझी माफी स्वीकारा.

logo
marathi.freepressjournal.in