विरोधक, सत्ताधाऱ्यांची निदर्शने; संसदेबाहेर जोरदार घोषणायुद्ध

नीट पेपरफुटी प्रकरणावरून संसद परिसरातील ‘मकर द्वार’ येथे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी एनडीएचे खासदार गुरुवारी आमनेसामने आले. यावेळी त्यांच्यात जोरदार घोषणायुद्ध झाले.
विरोधक, सत्ताधाऱ्यांची निदर्शने; संसदेबाहेर जोरदार घोषणायुद्ध
विरोधक, सत्ताधाऱ्यांची निदर्शने; संसदेबाहेर जोरदार घोषणायुद्ध(Photo-X)
Published on

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणावरून संसद परिसरातील ‘मकर द्वार’ येथे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी एनडीएचे खासदार गुरुवारी आमनेसामने आले. यावेळी त्यांच्यात जोरदार घोषणायुद्ध झाले.

विरोधी ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत ‘इस्तीफा दो’ (राजीनामा द्या), ‘गद्दी छोडो’ (सत्ता सोडा) आणि "शर्म करो" अशा जोरदार घोषणा दिल्या. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियंका गांधी-वढेरा यांच्यासह काँग्रेस व विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांनी हातात मोठा बॅनर धरून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इतर प्रमुख नेतेही या निदर्शनांमध्ये सहभागी झाले.

दुसऱ्या बाजूला, सत्ताधारी एनडीएच्या खासदारांनी विरोधी पक्ष या मुद्द्याचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. सत्ताधाऱ्यांनी "शर्म करो, शर्म करो" आणि "वंदे मातरम"च्या घोषणा देत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. एनडीए खासदारांच्या मते, नीटच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा होणे गरजेचे आहे, मात्र विरोधी पक्ष चर्चेपासून पळ काढत आहेत. संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी, अखिलेश यादव आणि इतर विरोधी नेत्यांनी या आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी एक विशेष बैठकही घेतली होती.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in