विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ दोन दिवसीय मणिपूर दौऱ्यावर ; म्हणाले, "राजकारण..."

विरोधी पक्षांच्या खासदारांचं शिष्टमंडळाने मणिपूरला दिलेल्या भेटीवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ दोन दिवसीय मणिपूर दौऱ्यावर ; म्हणाले, "राजकारण..."

मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. काही दिवसांपूर्वी येथील एक व्हिडिओ व्हायरल सर्वत्र खळबळ उडाली. देशभरातून या घटनेवर संताप व्यक्त केला गेला. यानंतर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडील नेत्यांनी मणिपूरला भेट देण्याचं ठरवलं होतं. आज शनिवार २९ जुलै रोजी विरोधी पक्षातील नेत्यांनी मणिपूरला भेट दिली. यानंतर काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारमुळे जगभरात भारताची प्रतिमा मलिन होत असून हे संपवण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न केले पाहीजेल. तसंच यावर शांततापूर्ण समाधान शोधण्याची गरज असल्याचं अधीर रंजन चौधरी म्हणाले. यावेळी त्यांनी आम्ही पीडितांना भेटण्यासाठी आलो आहोत. आम्हाला यात राजकारण करायचं नाही, असं देखील स्पष्ट केलं.

विरोधी पक्षांच्या आघाडीचे (इंडिया) २१ खासदारांचं शिष्टमंडळ शनिवारी हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दोन दिसांच्या दौऱ्यावर गेलं आहे. हे पथक अनेक मदत शिबीरांना भेट देणार आहे. मणिपूमध्ये पोहचल्यानंतर या शिष्टमंडळाने चुरचंदपूर येथील मदत शिबिरांमध्ये राहणाऱ्या कुकी समाजातील पीडितांची भेट घेतली. या शिष्टमंडळात तृणमुल काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, द्रविड मुन्नेत्र कळघम, राष्ट्रीय लोकशाही दल, राष्ट्रीय जनता दल, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी, जनता दल, भारतील कम्युनिस्ट पार्टी या पक्षांच्या खासदारांचा समावेश आहे.

विरोधी पक्षांच्या खासदारांचं शिष्टमंडळाने मणिपूरला दिलेल्या भेटीवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांचा हा फक्त दिखावा असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे. तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने पूर्वीच्या सरकारच्या काळात मणिपूर जळत होतं तेव्हा संसदेत एक शब्द देखील काढला नाही, असं सांगितलं. तसंच हे शिष्टमंडळ मणिपूरमधून परत येईल तेव्हा संसदेचं कामकाज होऊ द्यायचं नाही, असं देखील ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in