शेअर बाजार होणार अतिवेगवान; २८ मार्चपासून मिळणार 'हा' पर्याय; शेअर्स विकताच खात्यात येणार पैसे

शेअर्स खरेदी व विक्री केल्यानंतर भारतात सध्या व्यवहार (टी) + एक दिवस लागतो. म्हणजेच शेअर विकल्यानंतर दुसऱ्या दिवशी खात्यात पैसे जमा होतात. आता येत्या २८ मार्चपासून...
शेअर बाजार होणार अतिवेगवान; २८ मार्चपासून मिळणार 'हा' पर्याय; शेअर्स विकताच खात्यात येणार पैसे

मुंबई : शेअर्स खरेदी व विक्री केल्यानंतर भारतात सध्या व्यवहार (टी) + एक दिवस लागतो. म्हणजेच शेअर विकल्यानंतर दुसऱ्या दिवशी खात्यात पैसे जमा होतात. आता येत्या २८ मार्चपासून पर्यायी तत्वावर टी+० सेटलमेंट पद्धत लागू होईल, अशी माहिती सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी-बूच यांनी दिली. यामुळे खरेदीच्या दिवशी शेअर्स खात्यात येतील आणि शेअर्स विकल्यानंतर बाजार बंद होताच खात्यात पैसे जमा होतील, असे त्यांनी सांगितले.

‘ॲम्फी’च्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी पत्रकारांना सांगितले की, मार्चच्या अखेरीस बहुदा २८ मार्च रोजी टी+० सेटलमेंट पद्धत लागू केली जाईल. टी+0 म्हणजे व्यवहार ज्या दिवशी होईल. त्याच दिवशी त्याचे व्यवहार पूर्ण केले जातील.

२७ जानेवारी २०२३ रोजी, बीएसई व एनएसईत टी+१ सेटलमेंट व्यवहार सुरू झाले. व्यवहार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पैसे किंवा शेअर्स खात्यात यायचे. चीननंतर, भारत हा जगातील दुसरा देश बनला जिथे टी+१ सेटलमेंट सुरू झाली आहे.

टी+० केल्यानंतर सेटलमेंटची प्रक्रिया छोटी होईल. शेअर्स खरेदी केल्यास त्याच दिवशी सायंकाळी तो तुमच्या खात्यात जमा होईल. तसेच तो विकल्यास बाजार बंद झाल्यानंतर तात्काळ पैसे जमा होतील.

सेबीच्या अध्यक्षा म्हणाल्या की, पहिल्या टप्प्यात, टी+० सेटलमेंटसाठी व्यवहारासाठी दुपारी १.३० पर्यंत वेळ निश्चित केली जाईल. तर फंड आणि शेअर्सची सेटलमेंट प्रक्रिया ४.३० पर्यंत पूर्ण केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात एक पर्यायी सेटलमेंट पर्याय असेल ज्यामध्ये फंड आणि सिक्युरिटीज दोन्हीचे सेटलमेंट केले जाईल.

सध्या भारतात ‘टी+१’ सेटलमेंट पद्धत लागू आहे. जेव्हा तुम्ही शेअर बाजारात कोणतीही शेअर्स खरेदी किंवा विक्री करता तेव्हा त्याचा व्यवहार पूर्ण व्हायला एक दिवसाचा वेळ लागतो. आता टी+० लागू झाल्यानंतर तो व्यवहार त्याच दिवशी पूर्ण केला जाईल. सेबीच्या अध्यक्ष माधबी पुरी-बूच म्हणाल्या की, क्रिप्टोकरन्सीसारखे पर्याय वाढल्याने सेबीनेही व्यवहार वेगाने करण्याचे ठरवले आहे. क्रिप्टोकरन्सीचे सौदे दर तासाला केले जातात. गुंतवणूकदार कोणताही धोका न पाहता त्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळेच सेबीने भारतीय शेअर बाजाराला अधिक मजबूत करण्याबरोबरच वेगाने चालवण्याचे ठरवले आहे.

तत्काळ सेंटलमेंट २०२५ पासून

आता ‘टी+०’ सेटलमेंट पद्धत लवकरच सुरू होणार आहे, तर तत्काळ सेटलमेंट २०२५ पासून सुरू होणार आहे. याचाच अर्थ शेअर्सची खरेदी व विक्री होईल. त्याचवेळी त्याचे सेटलमेंट पूर्ण होणार आहे.

चीनमध्ये सर्वात वेगाने सेटलमेंट

चीनमध्ये सर्वात जास्त वेगाने सेटलमेंट होत आहे. संपूर्ण जगातील शेअर बाजारात टी+२ सेटलमेंट होते.

आतापर्यंत चीनमध्ये टी+० सेटलमेंट होते. आता भारतात टी+० सेटलमेंट होऊ लागल्यानंतर चीनची बरोबरी भारत करू शकेल.

पर्यायी सेटलमेंट टी+० चा अर्थ

सेबीच्या अध्यक्षा बूच म्हणाल्या की, भारतात टी+० पर्यायी सेटलमेंट व्यवहार सुरू झाले. याचाच अर्थ ट्रेडर्सना टी+० किंवा टी+१ पर्याय निवडीचे स्वातंत्र असेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in