नियंत्रण सुटल्याने बसची झाडाला धडस ; सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र...

या दुर्घटनेत २० प्रवासी जखमी झाले आहेत. यात काही विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे.
नियंत्रण सुटल्याने बसची झाडाला धडस ; सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र...

बेळगावमधील रामदुर्ग तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बिजगुप्पी गावाजवळ (ता. २६) केएसआरटीसी बसचा अपघात झाला आहे. बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने ती झाडावर जाऊन आदळली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसचा दर्शनी भागाचे मोठे नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत २० प्रवासी जखमी झाले आहेत. यात काही विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे.

अपघातात जखमी झालेल्यांवर खासगी, सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केएसआरटीसी बसमध्ये ५० हून अधिक प्रवासी होते. बस काल (ता. २६) पहाटे रामदुर्ग तालुक्यातील हुलकुंदहून रामदुर्गला जात असताना हा अपघात झाला.

या बस मध्ये शिक्षक देखील प्रवास करत होते. त्यात शिक्षकांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना प्लास्टर घालण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. बसचा असा अपघात घडल्यामुळे आणि वैद्यकीय उपचाराला वेळ लागल्यामुळे बसमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला उपस्थित राहता आलं नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in