दहापैकी चार कंपन्यांच्या बाजारमूल्यात तब्बल २.३१ लाख कोटी रुपयांची भर

दहापैकी चार कंपन्यांच्या बाजारमूल्यात तब्बल २.३१ लाख कोटी रुपयांची भर

गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात दहापैकी चार कंपन्यांच्या बाजारमूल्यात तब्बल २.३१ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. त्यात सर्वाधिक वाटा रिलायन्स इंडस्ट्रीजचा आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स ८८४.५७ अंक किंवा १.६१ टक्के वधारला. तर रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँकेच्या बाजारमूल्यात मोठी वाढ झाली असताना एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एलआयसी, एसबीआय, एचडीएफसी आणि भारती एअरटेल यांच्या बाजारमूल्यात ६८,१४०.७२ कोटींची घट झाली.

आघाडीच्या दहा कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने अव्वल स्थान कायम राखले आहे तर त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर लि., आयसीआयसीआय बँक, एलआयसी, एसबीआय, एचडीएफसी आणि भारती एअरटेल यांचा क्रम लागतो.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजारमूल्यात तबबल १,३८,२२२.४६ कोटींची भर पडून ते १८,८०,३५०.४७ कोटी रु. झाले. टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस (टीसीएस)चे ६४,६१८.८५ कोटींनी वधारुन १२,५८,२७४.५९ कोटी रु. झाले. तर इन्फोसिसचे २५,७२८.५२ कोटींनी वाढून ६,४०,३७३.९२ कोटी रु. तर आयसीआयसीआय बँकेचे २,७५०.५४ कोटींनी भर पडून ५,१७,०४९.४६ कोटी रु. झाले.

उलट, भारती एअरटेलचे बाजारमूल्य २५,९५५.२५ कोटींनी घसरुन ३,७६,९७२.७५ कोटी रु. झाले. तसेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी)चे मूल्य १३,४७२.२५ कोटींनी घटून ५,०६,१५७.९४ कोटी रुपये झाले. एचडीएफसीचे ९,३५५.०२ कोटींनी घटून ४,१३,२९९.३६ कोटी आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लि.च्या बाजारमूल्यात ८,९६३.६९ कोटींनी घसरुन ५,३८,५६१.५६ कोटी रु. झाले. एचडीएफसी बँकेचे ६,१९९.९४ कोटींनी घटून ७,६६,३१४.७१ कोटी तर स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)चे ४,१९४.५७ कोटींनी घसरुन ४,१४,३६९.७१ कोटी रु. झाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in