Indore : रामनवमीदिवशी मोठी दुर्घटना; मंदिरातील विहिरीवरील छत कोसळून २५हुन अधिक विहिरीत पडले

मध्य प्रदेशमधील इंदूरच्या स्नेह नगरमध्ये एक विहिरीवरील छत कोसळल्याने २५हून अधिक लोक अडकले
Indore : रामनवमीदिवशी मोठी दुर्घटना; मंदिरातील विहिरीवरील छत कोसळून २५हुन अधिक विहिरीत पडले
Published on

मध्य प्रदेशच्या इंदूरमधील स्नेह नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराच्या आवारात बांधलेल्या विहिरीवरील छत अचानक कोसळले. यामध्ये २५हून अधिकजण विहिरीमध्ये पडले असून तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. आज रामनवमीचा उत्साह असतानाच ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एकाचा मृत्यू झाला असून अद्याप अधिकृतरीत्या किती जीवितहानी झाली आहे याची माहिती अद्याप आलेली नाही. इंदूरचे पोलीस आयुक्त मकरंद देवस्कर घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.

एकीकडे देशभरात रामनवमी उत्साहात साजरी होत असताना मध्य प्रदेशमध्ये घडलेल्या या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्नेह नगरजवळील पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात हवन सुरु होते. यावेळी अनेक लोकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. दरम्यान, या मंदिरात बांधलेल्या विहिरीवरील छत कोसळून यामध्ये २५हून अधिक जण विहिरीत पडले. ही विहीर ५० फूट खोल असल्याची माहिती देण्यात आली असून १० वर्षांपूर्वी या विहिरीवर छताचे काम करण्यात आले होते. यामधून काही जणांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच, इतर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, नगरसेवक यांच्यासह प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

logo
marathi.freepressjournal.in