

नवी दिल्ली: केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी १३१ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासह ५ जणांना पद्मविभूषण जाहीर झाला. तसेच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबु सोरेन आणि ज्येष्ठ पार्श्वगायिक अलका याज्ञिक यांच्यासह १३ नामवंतांना पद्मभूषण पुरस्कारासाठी निवडले आहे, तर क्रिकेटपटू रोहित शर्मा, पॅरा अॅथलिट प्रवीण कुमार, महिला क्रिकेटर हरमनप्रीत कौर, हॉकीपटू सविता पूनियासह ११३ जणांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला. पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये १९ महिला आहेत, तर १६ जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे.
दिवंगत माजी अभिनेते धर्मेंद्र देओल (महाराष्ट्र), के. टी. थॉमस (लोककार्य), एन. राजम-कला (उत्तर प्रदेश), पी. नारायणन साहित्य व शिक्षा (केरळ), व्ही. एस. अच्युतानंदन (मरणोत्तर) लोककार्य (केरळ) यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
अलका याज्ञिक यांना कला (महाराष्ट्र), भगत सिंह कोश्यारी-लोककार्य (उत्तराखंड), डॉ. कालीपट्टी रामासामी पलानीस्वामी-वैद्यकीय --(तमिळनाडू), माम्मुटी-कला (केरळ), डॉ. नोरी दत्तात्रेयूडू वैद्यकीय (अमेरिका), पियूष पांडे (मरणोत्तर) कला (महाराष्ट्र), एस. के. एम. माइलानंदन - सामाजिक कार्य (तमिळनाडू), शतावधानी आर. गणेश कला (कर्नाटक), शिबू सोरेन (मरणोत्तर)- लोककार्य (झारखंड), उदय कोटक -व्यापार व उद्योग (महाराष्ट्र), व्ही. के. मल्होत्रा (मरणोत्तर) - लोककार्य (दिल्ली), वेल्लापल्ली नटेशन ---लोक कार्य (केरळ) विजय अमृतराज क्रीडा (अमेरिका) यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
तर, जागतिक स्तरावरील सर्वात मोठे मोफत वाचनालय उभारणारे माजी बस कंडक्टर, आशियातील पहिली मानवी दूध बँक सुरू करणारी बालरोगतज्ज्ञ आणि दुर्मीळ वाद्य वाजवणारे ९० वर्षीय कलाकार आदी ४५ जणांची प्रजासत्ताक दिनानिमित्त 'पद्मश्री' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. लोकनाट्य क्षेत्रातील कलाकार रघुवीर खेडकरांना तर कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड, पालघर जिल्ह्यातील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या धिंडा, अर्मिडा फर्नांडिस तसेच रामचंद्र आणि सुनीता गोडबोले (छत्तीसगड) यांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कर्नाटकातील म्हैसूरजवळील हरळहळ्ळी गावातील अंक गोडा, जे पूर्वी बस कंडक्टर होते, त्यांनी 'पुस्तक माने' हे जगातील सर्वात मोठे मोफत वाचनालय उभारले आहे. या वाचनालयात २० भाषांमधील २० लाखांहून अधिक पुस्तके तसेच दुर्मीळ हस्तलिखितांचा समावेश आहे. ७५ वर्षीय या ग्रंथप्रेमीची भारतभरातील विद्यार्थ्यांना वाचक आणि शिकणाऱ्यांच्या रूपात सक्षम करण्याच्या अनोख्या कार्यासाठी पद्मश्रीसाठी निवड करण्यात आली आहे. मुंबईतील बालरोगतज्ज्ञ आर्मिडा फर्नांडिस यांचीही निवड झाली आहे. त्यांनी आशियातील पहिली मानवी दूध बँक स्थापन करून नवजात बाळांच्या जगण्याच्या शक्यता लक्षणीयरीत्या वाढवल्या. याशिवाय मध्य प्रदेशातील बुंदेली युद्धकला प्रशिक्षक भगवनदास रायकर, महाराष्ट्रातील ९० वर्षीय आदिवासी तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा, जम्मू-काश्मीरमधील नामांकित समाजसेवक बृज लाल भट्ट यांचाही या यादीत समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले.
पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे -
भगवंदास रायकर (मध्य प्रदेश), ब्रिज लाल भट्ट (जम्मू-कश्मीर), चरण हेम्ब्रम (ओडिशा), चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश), डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू-कश्मीर), कोल्लक्कयिल देवकी अम्मा जी (केरळ), महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा), नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा), ओथूवर तिरुथानी (तमिलनाडु), रघुपत सिंह (उत्तर प्रदेश), राजस्तापति कालीअप्पा गौंडर (तमिळनाडु), सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालँड), थिरुवरूर बख्तवसलम (तमिलनाडु), अंके गौड़ा (कर्नाटक), डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश), गफरुद्दीन मेवर्ती (राजस्थान), खेम राज सुंद्रीयाल (हरियाणा), मीर हाजीभाई कसामभाई (गुजरात), मोहन नगर (मध्य प्रदेश), नीलेश मंडलेवाला (गुजरात), आर एंड एस गोडबोले (छत्तीसगढ़), राम रेड्डी ममिडी (तेलंगण), सिमांचल पात्रो (ओडिशा), सुरेश हनागवाड़ी (कर्नाटक), तेची गूबिन (अरुणाचल प्रदेश), युनम जत्रा सिंह (मणिपुर), बुधरी ताथी (छत्तीसगढ़), डॉ. कुमारासामी थंगाराज (तेलंगण), डॉ. पुण्णियामूर्ति नटेासन (तमिलनाडु), हॅली वॉर (मेघालय), इंदरजीत सिंह सिद्धू (चंडीगढ़), के. पाजनिवेल (पुद्दुचेरी), कैलाश चंद्र पंत (मध्य प्रदेश), नुरुद्दीन अहमद (आसाम), पोकीला लेकटेपी (आसाम), आर. कृष्णन (तमिळनाडु), एस. जी. सुशीलेम्मा (कर्नाटक), टागा राम भील (राजस्थान), विश्व बंधु (बिहार), धर्मिकलाल चूनीलाल पांड्या (गुजरात), शफी शौक़ (जम्मू-काश्मीर)
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिवसापूर्वी केंद्र सरकारने शौर्य पुरस्कार व सेवा पदक जाहीर केले आहे. अंतराळवीर व हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना 'अशोक चक्र'ने सन्मानित करण्यात येणार आहे. तीन जणांना कीर्ती चक्र व १३ जणांना शौर्यचक्र जाहीर झाले. ९८२ पोलीस, अग्निशमन, होमगार्ड, सिव्हील डिफेन्स यांना उत्कृष्ट सेवेसाठी सन्मानित करण्यात आले. त्यातील १२५ शौर्य पदक आहेत.